प्रवीण छेडा स्वगृही परतले

प्रवीण छेडा स्वगृही परतले

मुंबंई नगरी टीम

मुंबई : भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून इतर पक्षांतील नेते भाजपमध्ये येण्याची लाटच आल्यासारखी दिसते आहे.डॉ. भारती पवार आणि काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी आज  भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉनवर हा कार्यक्रम झाला.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दोघांचाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असून, त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याने आपल्याला आनंद होत आहे.प्रवीण छेडा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवीण छेडा यांच्यासह डॉ. भारती पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.प्रकाश मेहतांशी पटत नसल्याने प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घरवापसी केली आहे.

भाजपने काल लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करताना ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित केला नाही.या जागेवर किरीट सोमय्या विद्यमान खासदार असून युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचा सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही जोरदार चर्चा आहे. संजय काकडेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. नाराज असलेल्या संजय काकडे यांचे मन वळवण्यात फडणवीस यांना यश आले आहे. संजय काकडे कुठेही जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleशिवसेनेच्या २१ उमेदवारांची यादी जाहीर
Next articleसुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी