महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीतांचा भेटीगाठीवर जोर
मुंबई नगरी टीम
पालघर : शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार यांनी आपल्या प्रचारादरम्यान गाठीभेंटींवर जोर दिला आहे. प्रचार फेरीत त्यांनी विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांशी संवादावर भर दिला आहे.
प्रचार फेरी दरम्यान राजेंद्र गावीत यांनी वसई व परिसरातील विविध कार्यक्रमासह अर्नाळा गाव, व किल्ल्याला भेट देतानाच भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. समाज माध्यम आणि थेट मतदारांशी संवाद साधतानाच त्यांनी ख्रिस्ती युवक संघटनांशी चर्चा करतानाच थेट पापडी येथिल इस्कॅान यात्रेत जावून मतदारांशी संपर्क साधला. माजी खासदार राम नाईक यांच्या प्रयत्नातून अर्नाळा किल्ल्यावर १६ वर्षापूर्वी वीज आली होती. तो दिवस गावकरी प्रकाश दिन म्हणून साजरा करतात. येथिल गावकरांच्या आग्रहास्तव गावित या उत्सवात सहभागी झाले होते.यावेळी गावक-यांनी गावीत यांचे स्वागत करून मिरवणूक काढली.या मध्ये मोठ्या तरूण तरूणी सहभागी झाले होते.या दौ-यात आ. रविंद्र फाटक, चंद्रशेखर धुरी, महेंद्र पाटील आदी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.