खा. कीर्तिकरांच्या प्रचारात सुभाष देसाईंसह विद्या ठाकूरांची उपस्थिती

खा. कीर्तिकरांच्या प्रचारात सुभाष देसाईंसह विद्या ठाकूरांची उपस्थिती

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातील शिवसेना-भाजप महाआघाडीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी आज गोरेगाव येथून सायकल फेरी काढण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी  राज्यमंत्री विद्या ठाकूर, जयप्रकाश ठाकूर, रिपाईचे रमेश पाईकराव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित होते.

पंतप्रधान  नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी एनडीएच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी सुभाष देसाई यांनी केले. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. त्यांना पुन्हा निवडून देण्यासाठी आज ही भव्य सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत दोनशे पेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिक, भाजप, रिपाईचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Previous articleमहायुतीचे उमेदवार  राजेंद्र गावीतांचा भेटीगाठीवर जोर
Next articleचिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या