मनोज कोटक यांनी साधला नागरिकांशी थेट संवाद
मुंबई नगरी टीम
मुंबई : उत्तर पुर्व ( ईशान्य ) मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाइं महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचारात रंगत आणली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उत्तर पुर्व ( ईशान्य ) मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाइं महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आता थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. आज त्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध उद्याने रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. यावेळी असंख्य मतदारांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कोटक यांनी मुलूंड पश्चिमेच्या जॅान्सन आणि जॅान्सन उद्यानात प्रभात फेरीसाठी आलेल्या मतदारांशी विविध मुद्द्यावर चर्चा करित मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच या उद्यानातील हास्य क्लबच्या सदस्यांशी वार्तालाप केला.प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधत त्यांनी मुंलूंड रेल्वे स्थानकात जावून रेल्वे प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत चर्चा केली. देवीदयाल उद्यानात प्रवेश करताच कोटक यांच्याशी सेल्फी काढण्याची इच्छा अनेक मतदारांनी व्यक्त केली.