राजेंद्र गावीतांचा गाठीभेटींवर भर

राजेंद्र गावीतांचा गाठीभेटींवर भर

मुंबई नगरी टीम

मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी जिल्ह्याच्या वसई विरार, डहाणू, पालघर, वाडा यासह संपूर्ण मतदारसंघातील तळागाळातील कष्टकरी जनता,सर्वसामान्यांसह अनेक समाजसेवी व सामाजिक संघटनांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. मतदानापुर्वीचा काल शेवटचा रविवार असल्याने गावितांसह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारसंघात अनेकांच्या गाठीभेटी घेत जोरदार प्रचार केला.

पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र  गावीत यांच्या प्रचाराने आता मोठा जोर पकडला असल्याचे चित्र आहे.मागील आठवड्यापासून महायुतीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत गावितांना पालघर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. यामध्ये वसई विरार मतदार संघातून ख्रिस्ती मशनरीज व चर्च संघटना श्री शेषवंशीय क्षत्रिय देवकर भंडारी समाज, पालघर, आगरी सेना अशा अनेक तलागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचलेल्या सामाजिक संघटनांचा समावेश आहे. काल रविवार सुट्टीचा दिवस साधत गावीत यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर  भर दिला. खुद्द उमेदवारच घरी आल्याने अनेक ठिकाणी ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले. दुपार नंतर पुन्हा पदयात्रांच्या माध्यामंतून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला.

 

 

 

Previous articleमनोज कोटक यांनी साधला नागरिकांशी संवाद
Next articleडॉ. श्रीकांत शिंदे यांना  वाढता पाठिंबा