मुंबै बँकेच्या सभासदांना ५ कोटीच्या लाभांशाचे वाटप
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना १९७४ साली झाली असून, बँकेच्या स्थापनेपासून बँक सातत्याने नफ्यात आहे. शासकिय लेखापरिक्षण अहवालात बँक अ’ वर्ग प्राप्त करीत असून,नुकताच बँकेने आपल्या सभासदांना ५.१५ कोटी इतका लाभांश वितरीत केला आहे. अशी माहिती
बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवी ५७०० कोटी असून कर्ज व्यवहार ३००० कोटीचा आहे. बँकेची आर्थिक
उलाढाल ७००० कोटींची असून, सीडी रेशो ५५ टक्के एवढा आहे. बँक आपल्या ५३ शाखा व ४ विस्तारकक्षांद्वारे कोअर बँकींग प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना शूचक व तत्पर सेवा देत आहे.बँकेचा सीडी रेशो ५५ टक्के असून सीआरएआर ११.२२ टक्के इतका आहे. रिझर्व्ह बँक व नाबार्ड या नियामक
मंडळाच्या नियमांचे बँक काटेकोरपणे पालन करीत आहे.सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये राज्यातील इतर सहकारी जिल्हा बँकांना लाभांश वाटप करणे शक्य होत नसताना मुंबई बँक आपल्या सभासदांना नियमितपणे लाभांश वितरीत करीत आहे. नुकताच बँकेने आपल्या सभासदांना ५.१५ कोटी इतका लाभांश वितरीत केला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार दरेकर यांनी दिली.