बापरे…मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्या विरोधात १ हजार कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबै जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बॅंक आहे.कारण मुंबै बॅंक आम्ही बाराशे कोटीच्या टप्प्यावरून दहा हजार कोटीवर मेहनतीने आणली.मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुदैर्वाने काही जणांकडून झाले आहे.त्यामुळे बॅंकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल हे अयोग्य असल्यामुळे बँकेने कालच मुंबई उच्च न्यायालयात १ हजार कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी आज दिली.

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की,मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला इथपर्यंत आणण्यात अनेक माजी अध्यक्ष,संचालक आंदीचे योगदान आहे. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. पण बॅंकेला काळिमा फासण्याचे काम सर्व टप्प्यावर होत आहे.आमची राजकीय बदनामी करा,वैयक्तिक बदनामी करा परंतु एका आर्थिक संस्थेची बदनामी झाल्याचा परिणाम त्यांचे ग्राहक, डिपॉझिटर्स यांच्यावर होतो.या बँकेवर हजारो लोकांचे पोट अवलंबून असते.एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? म्हणून आम्ही मुंबई बँकेच्या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात सूट नंबर २१९०९ आणि सूट नंबर २१९३५ या नोंदणी क्रमांकप्रमाणे दावा दाखल केला आहे. बॅंकेची नाहक बदनामी करणा-यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही न्यायालयात केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.आम्ही सव्वा रुपया वगैरेचा नाही तर १ हजार कोटीचा दावा दाखल केल्याचा मार्मिक टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

Previous article१ ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे १० रूपयाला मिळणार
Next articleमंत्री बीड जिल्ह्यात येऊन गेले पण गाडीतून खाली उतरल्याचे दिसले नाही