राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांचा राजीनामा ; शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांचा राजीनामा ; शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्याच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. आमदार बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या पक्षबदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.आज अचानक आमदार बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. बरोरा यांनी आपला राजीनामा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्याने पांडुरंग बरोरा हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दशकापासून बरोरा कुटुंबाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी स्नेहसंबंध होते.लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता इतर पक्षांतील आमदारांनी पक्ष बदलास सुरूवात केल्याचे चित्र आहे.बरोरा हे काही दिवसात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Previous articleआता मुंबईत करा फक्त ५ रुपयात “बेस्ट प्रवास”
Next articleगिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी :  ५०९० घरांची लॉटरी