कर्जतमध्ये भाजपच्या माजी मंत्र्याला आमदार रोहित पवारांनी दाखवले आस्मान

मुंबई नगरी टीम

कर्जत । सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना आस्मान दाखवत दणदणीत विजय मिळवला आहे.

कर्जतच्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निर्विवाद वर्चस्व राखत एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत ११ उमेदवार विजयी झाले आहेत.या ठिकाणी एका जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला असल्याने राष्ट्रवादीने एकूण १२ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीचा तब्बल १५ जागांवर विजय झाला आहे.

Previous articleकवठेमहांकाळ मध्ये आबांचा लेक रोहित पाटीलचा डंका ! विरोधक चितपट
Next articleशिवसेनेची बाजी : माजी मंत्री शशिकांत शिंदेंना सलग तिस-यांदा पराभवाचा धक्का