भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई !

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मंत्री आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आमदार यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आता गणेश नाईक यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने नेरळ पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या महिलेने केलेल्या तक्रारीत गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणे, जीवे मारण्याची धमकी देणे,अशा प्रकारचे आरोप या महिलेने केले आहेत.राज्य महिला आयोगाने यांची दखल घेतल्यानंतर आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाईक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची देखील कारवाई केली जाईल,असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या रुपालीताई चाकणकर !

एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्विकार न करणारे भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. गणेश नाईक यांना याप्रकरणी तात्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल.

Previous articleशिवसेनेचे हिंदुत्ववादी मतदान कुठे गेले ? विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सवाल
Next article७७ हजार मते फक्त भाजपची असतील तर त्यामध्ये मित्र पक्षांचे अस्तित्व नाही का ?