भाजपच्या १०५ पैकी ५० आमदार हे राष्ट्रवादीतून गेलेले आहेत हे लक्षात ठेवा ; सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । निवडणूका असो किंवा नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात.विरोधी पक्षात असताना जनतेने शरद पवार यांना जास्त प्रेम दिले आहे तसेच सत्तेत असतानाही दिले आहे.आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले ५० आहेत हे लक्षात ठेवा असे सूचक विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. यावेळी त्या बोलत होते.आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत काय करायचे असे जेव्हा शरद पवार यांना विचारते त्यावेळी शरद पवार पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत हाही किस्सा सुळे यांनी यावेळी सांगितला.पैसे देऊन जाणारे आहेत त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने नेतृत्व हाती घ्यावे असे देशातील लोकांना वाटत आहे असेही सुळे यांनी आवर्जून नमूद केले.नवाब मलिक यांनी दिल्लीला अक्षरशः हलवून सोडले होते. मोठा फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई झाली हा एकप्रकारे अन्याय झाला आहे असेही सुळे म्हणाल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Previous articleआज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही ; शरद पवारांचा भाजपला इशारा
Next articleमध्यप्रदेशसाठी केंद्र सरकारने दाखवलेली तत्परता महाराष्ट्रासाठी का नाही ?