दगडफेक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यास भाजपाच्यावतीने पुन्हा तीव्र आंदोलन

मुंबई नगरी टीम

मुंबई । पोलखोल अभियान रथयात्रेवर दगडफेक केलेल्या संशियत आरोपींना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. परंतु केवळ यांना अटक करुन चालणार नाही, तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून संशयित आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. परंतु जर पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यास भाजपाच्यावतीने पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.तसेच रथयात्रा तोडफोड प्रकरणात युवा सेनेचा एक पदाधिकारी सीसीटीव्ही फुटेजमध्ये असल्याचे दिसत असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या तोडफोड प्रकरणामध्ये कोणाचा हात आहे, याचा आता पोलिसांनी तपास करावा, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी सांगितले की, यात महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचा हात असल्याचा दाट संशय आहे, असे आम्ही कालच पोलिसांना सांगितले होते. तरीही चेंबूर येथील पोलखोल अभियानाच्या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काल रात्रीपर्यंत एफआयआर दाखल केला नाही तसेच दोषींच्या विरोधात कारवाई केली नाही. पण जर संबंधित आरोपींविरोधात कारवाई झाली नाही तर आम्ही उद्या पुन्हा मोर्चा आणू, असा इशारा आम्ही कालच पोलिसांना दिला होता. अखेर पोलिसांनी आमच्या तक्रारीची दखल घेत राजश्री पालंडे यांच्या माध्यमातून एफआयआर दाखल करण्यात केला असून काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल विधिमंडळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, तर विधान परिषदेत सभागृहाचा विरोधी पक्षनेता म्हणून मी स्वतः, आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून करण्यात आली तसेच मुंबईतील भाजपचे नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांनीही मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार, घोटाळा आम्ही वेळोवेळी उघड केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात भाजपने पोलखोल अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांच्या काळ्या कारकीर्दीचा इतिहास मुंबईकरांसामोर येईल आणि आपले पितळ उघडे होईल, या भीतीने निश्चितपणे हे पोलखोल अभियान कसे दाबता येईल. तसेच पोलिसांच्या माध्यमातून व काही गुंड प्रवृत्तींना हाताशी धरून हे अभियान उधळून लावण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. भोंग्याच्या प्रश्नावरून केंद्र सरकारने काही सर्वसमावेशक भूमिका आखून द्यावी, असे संजय राऊत म्हणत आहेत. परंतु केंद्र सरकारने काय करायचे हे ठरवायला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सक्षम आहेत. पंतप्रधान म्हणून ७ वर्षांच्या कालावधीत त्यांनी धाडसी निर्णय घेत, कलम ३७० सारख्या विषयावर निर्णय घेण्याचे धाडस पंतप्रधान मोदी यांनी दाखविले. त्यामुळे केंद्र सरकारने काय करावे याचा सल्ला घेण्याची वेळ अजून तरी आलेली नाही, हे राऊत यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे आपल्या पायाखाली काय जळते, त्याचा आधी विचार करावा. केंद्राकडून काय करायचे आहे ते निश्चितच केंद्र सरकार करील, असा टोलाही

Previous articleपुणेकरांना राज्य सरकारचे गिफ्ट; स्वारगेट ते कात्रज भूयारी मेट्रोला मान्यता
Next articleभोंग्याच्या मागून कोण बोलतंय हे सर्वांना कळतंय .. जितेंद्र आव्हाडांचा शेलक्या शब्दात टोला