भाजपचा बोलबाला ! भाजपला ३८४,राष्ट्रवादीला ३४४, काँग्रेसला ३१६ तर सेनेला २८४ जागा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील एकूण ९७ नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांची आज घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक ३८४ जागा मिळाल्या आहेत.सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुस-या क्रमांकाच्या ३४४ जागा मिळाल्या आहेत.त्या खालोखाल काँग्रेसला ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या आहेत.गडचिरोलीतील ९ नगरपंचायतींची मतमोजणी उद्या होणार आहे तर शिर्डीत एकूण १७ जागांपैकी ११ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत.

राज्यातील एकूण ९७ नगरपंचायतीच्या निवडणूक निकालांची घोषणा आज करण्यात आली आहे.त्यामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या आणि या निवडणूकीत वेगवेगळे लढलेल्या महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्यातरी राज्यात या निवडणूकीत भाजप ३८४ जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला आहे. या निवडणुकीत भाजपला ३८४,राष्ट्रवादी काँग्रेसला ३४४,काँग्रेसला ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या आहेत. सीपीआय ( एम) या पक्षाला ११ बसपाला ४ आणि मनसेला ४ जागा मिळाल्या आहेत.तरप अपक्षांना २०६ जागांवर विजय मिळाला आहे.इतर ८२ जागांवर निवडून आले आहेत.गडचिरोलीतील ९ नगरपंचायतींची मतमोजणी उद्या होणार आहे.

Previous articleबीडमध्ये पंकजा मुंडेंचा जलवा ! राष्ट्रवादीला ‘जोर का झटका’
Next articleनिवडणूक निकाल : विदर्भात भाजप अव्वल मात्र सरशी महाविकास आघाडीची