“पारदर्शक” हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द

“पारदर्शक” हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द

 मुंबई नगरी टीम

मुंबई : ‘पारदर्शक’ हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे त्यामुळे पुरग्रस्त जिल्हयात काय परिस्थिती आहे हे पारदर्शकपणे सगळ्यांना सांगण्याची गरज आहे असा टोला राष्ट्रवादीच्या  खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

पुरग्रस्त भागातील जिल्हयात सध्या मदतीची गरज आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली. पुरपरिस्थिती कशामुळे निर्माण झाली आहे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पुरग्रस्तांना तातडीची मदत पोचवणे, त्यांना औषधांचा साठा देणे आणि त्यांची घरे तात्काळ कशी उभी करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. हे भावनिक विषय आहेत. नुसतं घर दिलं, बिस्किटचा पुडा दिला की आपली जबाबदारी संपणार नाही. आपल्याला तिथे सगळ्यांना जावून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी आपली आहे असेही सुळे म्हणाल्या.

शरद पवार मुख्यमंत्री असताना लातुरचा भूकंप झाला होता. त्यावेळी सलग १५ दिवस प्रशासन घेवून ते लीड करत होते अशी आठवणही  सुळे यांनी यावेळी सांगितली.जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी तिथे जावून मांडी घालून बसलंच पाहिजे आणि लोकांना वेळ दिला पाहिजे असेही सुळे यांनी सांगितले.पवार  आजही कराडला जात आहेत. आमचे सगळे नेते विशेषतः अजितदादा, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींसह सगळेच नेते फिल्डवर जावून अंग झटकून काम करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असेही  सुळे यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ? येदीयुरप्पा की फडणवीस ?
Next articleपूरग्रस्तांसाठी केंद्राने ६ हजार ८१३ कोटींची मदत द्यावी : मुख्यमंत्री