या कारणाने अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला
मुंबई नगरी टीम
मुंबई : औरंगाबादमधील सिल्लोडचे काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी होती पण ती जबाबदारी सत्तेत असतानाही शिवसेनेने पार पाडली या कारणामुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सत्तार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती.त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या पण स्थानिक भाजपा नेत्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला प्रखर विरोध केला.त्यांनी गिरीश महाजन,रावसाहेब दानवे,यांच्याकडे अनेक चकरा मारल्या. परंतु कोणताही निर्णय न झाल्याने सत्तार यांनी अखेर शिवसेनेची वाट धरल्याचे बोलले जात आहे. अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्षप्रवेशा नंतर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या पीकविमा, कर्जमाफी सबंधित प्रश्नांवर शिवसेना आवाज उठवित आहे खरंतर मी काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी होती पण ती जबाबदारी सत्तेत असतानाही शिवसेनेने पार पाडली. या कारणामुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सत्तार यांनी सांगून, येत्या काळात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे देखील ते म्हणाले.