गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी

गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी काल सोलापूरात महाजनादेश यात्रेच्या समारोपाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी आज मुंबईतील सिद्धीविनायक गणपतीचे आणि लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव काळात अमित शाह हे आवर्जून सिद्धिविनायक आणि लालबागच्या दर्शनाला येत असतात.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. त्यानंतर आज शाह यांचे मुंबईत आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री विद्या ठाकूर व योगेश सागर, खा. मनोज कोटक व आ.पराग आळवणी उपस्थित होते. त्यांनतर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार होते. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. शाह यांच्या उपस्थितीमुळे सिद्धिविनायक मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आजूबाजूच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती. तसेच, मंदिर परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव काळात अमित शाह हे आवर्जून सिद्धिविनायक आणि लालबागच्या दर्शनाला येत असतात.

Previous articleया कारणाने अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला
Next articleपाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष