चंद्रकांत पाटील कोथरूड मधून निवडणुक लढवणार

चंद्रकांत पाटील कोथरूड मधून निवडणुक लढवणार

मुंबई  नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यावरून लक्ष केलेले आणि विधानसभेचे निवडणूक न महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.पुण्यातील भाजपसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जाणा-या कोथरूड मधून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. राज्यात भाजपाती सत्ता येताच चंद्रकांत पाटील यांना पक्षात आणि सरकार मध्ये महत्वाची पदे मिळत गेल्याने पक्षातील त्यांचे महत्व वाढले आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी कोल्हापूर पट्ट्यात त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधणे अडचणीचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून विधानसभा निवडणुक लढवल्यास त्यांच्या विरोधात लढण्याची घोषणा केली आहे.चंद्रकांत पाटील सध्या पुण्याचे पालकमंत्री आहेत.राज्यात भाजपाची शक्ती वाढल्याने  ते विधानसभेच्या मैदानात आपले नशीब आजमावण्याची शक्यता आहे. भाजपसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जाणा-या कोथरूड मधून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

Previous articleराष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश
Next articleराज ठाकरे ५ ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार