राज्य विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन 

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन आज बुधवारी होत असून,या विशेष अधिवेशनात लोकसभा व विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत पुढील दहा वर्षांसाठी वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या घटनादुरुस्ती विधेयकाला समर्थन देणारा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येवून मंजूर केला जाणार जाईल.

केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी कलेले घटना दुरस्ती विधेयक संमत केले आहे. संविधानातील अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत समर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यास मंत्री परिषद बैठकीत ठरले होते.त्यानुसार एकदिवसीय अधिवेशन आज बुधवारी होत असून,कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या कामकाजानुसार विशेष अधिवेशनात सकाळी ११ वाजता विधानमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.त्यानंतर नुकत्याच करण्यात आलेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा परिचय करून दिला जाईल.अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर,राज्यसभा सचिवालयाकडून संविधान विधेयक २०१९ यासह संविधानातील सुधारणेच्या अनुसमर्थनार्थ प्राप्त झालेला संदेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर या विधेयकाच्या समर्थनाबाबत ठराव मांडण्यात येवून तो मंजूर केला जाईल.

Previous articleकृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द
Next articleराज्यात लवकरच तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना