कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द

कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजप सरकारने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेवून या समित्यांवर आपल्या कार्यकर्त्यांच्या नेमणूका केल्या होत्या.या नियुक्त्यांना न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतकृषी उत्पन्न बाजार समित्यांवर तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने यापूर्वीच्या भाजप सरकारने या समित्यांवर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी १३ जून २०१५ पासून विशेष निमंत्रित तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर नेमणूका केल्या होत्या.भाजप सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा नियुक्त्या रद्द करण्यास मान्यता देण्यात येवून,ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली.

Previous articleएक वडापाव खावून लोकांच्या कामासाठी मंत्रालयात फिरायचो: धनंजय मुंडे
Next articleराज्य विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन