मातंग समाजाला शिवसेनेकडून न्यायाची अपेक्षा ; धनराज थोरात
मुंबई नगरी टीम
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षे मातंग समाजाची एकही मागणी पूर्ण केली नाही त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता त्या आधारावर चांदिवली येथील दिलीप लांडे यांच्यासह अनेक शिवसेनेचे उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले. त्यामुळे येत्या काळात शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातंग समाजाचे प्रश्न नक्की मार्गी लावणार अशी आशा करीत मातंग समाजाच्या मागण्यांना न्याय मिळावा अशी मागणी महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे प्रमुख धनराज थोरात यांनी केली आहे. तसेच यापुढेही मातंग समाज शिवसेनेच्या कायम पाठीशी राहणार असल्याचे धनराज थोरात यांनी सांगितले.
भाजप शिवसेना युतीचे सरकार असताना भाजप ने शिवसेनेसोबत सुद्धा दूजाभाव केला तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व मातंग समाजाला न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला नाकारून शिवसेनेच्या हाती मुख्यमंत्र्याची धुरा सोपविली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम अन्यायग्रस्त जनातेसोबत मातंग समाजालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्याय देणार अशी आशा आहे असे धनराज थोरात यांनी पत्रकारांसोबत बातचीत करताना मत व्यक्त केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील झोपडी धारकांचा प्रश्न सोडवावा, अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची नियोजित घाटकोपर येथील जागा बदलून पूर्वीपासून मागणी असलेली दादर येथील गोल्ड मोहर मिल येथे ७ एकर ५ जमिनीवर गुंठे स्मारक बांधण्यात यावी, राज्यातील मातंग समाजाला १३ टक्के आरक्षणातून अ ब क ड वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, धनगर समाज व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, मातंग समाजातील एमपीएससी व यूपीएससी च्या मुलामुलींसाठी शासनाने पुणे येथे क्लासेस सुरू करावे अशा अनेक मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करून चंदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांच्यासमवेत मुंबई,ठाणे,उल्हासनगरसह ३० जिल्ह्यातील शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.