देवेंद्रजी तुम्ही दिल्लीत गेला तर आम्हाला सुगीचे दिवस येतील!


मुंबई नगरी टीम

मुंबई: अर्थसंकल्प सोप्या भाषेत या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज  झाले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली.’आमच्याही  अर्थसंकल्पावर’  पाच दहा पुस्तके  लिहा असा मिश्किल सल्ला  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला,तर उत्तम लेखक असलेल्या देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेल्यास आम्हालाही सुगीचे दिवस येतील,असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावल. यावेळी सभागृहात एकाच हंशा पिकला.

अर्थसंकल्प सोप्या भाषेत या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिश्किल वक्तव्यांमुळे  हंशा  आणि टाळ्यांनी सभागृह दुमदुमून गेले. आमच्याही  अर्थसंकल्पावर  पाच दहा पुस्तके  लिहा, असा मिश्किल सल्ला  मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला,तर उत्तम लेखक असलेल्या  फडणवीसांनी दिल्लीत गेल्यास  आम्हालाही सुगीचे दिवस येतील असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.याप्रसंगी सर्वच वक्त्यांनी  राज्याचा  अर्थसंकल्प प्रकाशित होण्याच्या दोन दिवस आधी प्रकाशित होत असलेल्या या माहितीपूर्ण पुस्तकाबद्दल फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, मराठीत प्रथमच अर्थसंकल्प कसा वाचावा यावर असे पुस्तक लिहिले गेले असेल.अर्थसंकल्पात  कोणाचा खिसा कसा कापला गेला हे कळत नाही तो यशस्वी अर्थमंत्री  मात्र यातून येेतो तो जनतेचा पैसा असतो याची जाणीवही असावी.त्यांचे  अर्थसंकल्प कसा हे   लिहिलेले पुस्तक आपल्या हस्ते प्रकाशित होत आहे पण हा प्रसंग त्यांंच्यामुळेच आपल्यावर आला आहे. त्यांनी अशी  पाच-दहा पुस्तके आमच्या अर्थसंकल्पावर लिहावीत  असा टोलाही त्यांनी लगावला.नोटाबंदी व त्याचे परिणाम याचाही उल्लेख अर्थसंकल्पात असावा की नाही असा मिश्किल  सवालही त्यांनी यावेळी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या पुस्तकाचा सामान्य माणूस ते अर्थमंत्री अशा सर्वांनाच उपयोग होणार आहे.अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत असताना तो सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावा अशी अपेक्षा असते. आपण या आधी अर्थसंकल्प मांडला तेव्हा सर्व विरोधी सदस्य गोंधळ घालत होते, फक्त फडणवीस हेच शांतपणे मुद्दे लिहीत होते अशी आठवणही त्यांनी सांगितली. फडणवीस हे उत्तम लेखक होऊ शकतात अशा शुभेच्छा देतानाच,फडणवीस यांनी दिल्लीत जावे म्हणजे त्यांच्या पक्षातील काही लोक आनंदी होतील व आम्हालाही सुगीचे दिवस येतील यावर अजित पवार यांच्या फिरकीवर एकच हशा पिकला.

फडणवीस म्हणाले, सामान्य माणसालाही अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय ते कळावे यासाठी हे पुस्तक लिहीले. याआधी २००५ साली अर्थसंकल्प  म्हणजे नेमके काय असे पुस्तक लिहीले त्याचा सदस्यांना चांगला उपयोग झाला.  यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  यांचीही भाषणे झाली.

Previous articleग्रंथालयांसाठी पुढील अधिवेशनात नवे धोरण
Next article…तर एक दिवस जनतमध्ये उद्रेक होईल :दरेकर