मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात आणि राज्यातील ग्रामिण भागात कोरोनाचा विषाणू झपाट्याने हातपाय पसरत असल्याचे चित्र असतानाच,याचा धैर्याने मुकाबला करणारे डॉक्टर,नर्स,पोलीस,आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांच्या सेवेसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तरूण आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहेत.या कर्मचा-यांना आवश्यक असणा-या सुविधा पुरविण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहे.
शहरी भागासह ग्रामिण भागात आता कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. राज्यातील विविध भागात याचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर,नर्स,पोलीस,आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका,आशा सेविका आपल्या परिवाराची काळजी न करता जनतेची सेवा करतानाचे चित्र आहे.तर या कर्मचा-यांसाठी आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.या मतदारसंघातील पोलिस आणि आरोग्य सेवक यांच्यासाठी त्यांना मास्क,सॅनिटायझर रोहित पवार यांनी उपलब्ध करुन दिले आहे.तर गावात फवारण्यासाठी केमिकल्सचीही खरेदी करुन सर्व गावात ते पाठवूनही दिले आहे.दुसऱ्या टप्प्यात सर्व आरोग्य सैनिकांसाठी रोहित पवार यांच्यावतीन गॉगल पुरवण्यात येत आहे. या गॉगलची पाहणी करुन त्यांनी स्वतःच्या हाताने पॅकिंग केली. या प्रत्येक कामावर रोहित पवार यांचे बारकाईने लक्ष आहे.