मुंबई नगरी टीम
मुंबई : गो कोरोना कोरोना गो चा नारा देणारे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जनतेने कोरोना विरुद्ध चा लढा यशस्वी करण्यासाठी घरीच राहा असे आवाहन करीत असून लॉकडाऊन काळात घरी राहण्यासाठी विविध खेळ;छंद ; व्यायाम; पुस्तक वाचन करण्यात वेळ घालवावा असे सांगताना आज त्यांनी चक्क स्वयंपाकघरात जाऊन आवडती रेसिपी म्हणजे आम्लेट तयार केले.
स्वयंपाक घरात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाऊन त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्याकडील स्वयंपाकघराचा ताबा घेत गॅस पेटवून आम्लेट तयार केले. आठवलेंनी तयार केलेले आम्लेट त्यांचे चिरंजीव कुमार जित यांनी टेस्ट केले. वडीलांनी बनविलेले आम्लेट खाल्यानंतर जितने या रेसिपीची तारीफ केली. वर्षोनुवर्षे समाजकार्यात राजकीय कारकीर्दीत आठवलेंना घरी थांबण्यास इतका वेळ कधीही मिळाला नाही.लॉकडाऊनमुळे आठवले घरी तळ ठोकून आहेत.आठवले यांचा वेळ मिळत असल्याने त्यांचे कुटुंबीय आनंदी आहेत. आठवले यांनी कधीही किचन मध्ये पाय ठेवला नाही मात्र आता लॉकडाऊन मुळे त्यांनी आज किचन मध्ये थांबून आम्लेट बनविले.मला चहा सुद्धा चांगला बनविता येतो असे त्यांनी सांगितले.