मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी आणि निर्मूलन करण्याच्या दृष्टीने शासकीय आणि महापालिका यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय व सूसूत्रता आणणे गरजे असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांन व्यक्त केले आहे.
मुंबईतील भाजी मार्केट अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला पण त्याची अंमलबाजणी योग्य पध्दतीने कार्यान्वित झाले नाही. कारण आजही मुंबईतील भाजी मार्केटमध्ये गर्दी दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही, विविध रुग्णालयात परिचारिका व सपोर्टींग स्टाफ ला सुरक्षा किट उपलब्ध नाही, काही ठिकाणी सॅनिटायझेशन बंद केले आहे, अनेक भागामध्य रेशनिंग वाटपामध्ये अव्यवस्था, अडकलेल्यांसाठी उपाययोजना केलेली दिसत नाही. असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, शासकीय मदतीची माहिती गरजू व लाभार्थ्यांपर्यंत नीट पोहचत नाही. त्यामुळे शासनाच्या गृह, नगर विकास, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, परिवहन, महसूल, पाणीपुरवठा व स्वच्छता, कामगार आदी विभागातील संबंधित यंत्रणांनी नीट समन्वय करत गरजू व लाभार्थ्यांना मीडिया, सोशल मीडिया अथवा तत्सम यंत्रणेमार्फत नीट मदतीची व वितरणाची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. तरीही या संबंधित यंत्रंणांनी तातडीने समन्वयाच्या दृष्टीने कार्यवाही व अंमलबजावणीची करण्याची अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली आहे.