बारावीत जाणा-या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !..मग ही बातमी वाचाच

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सध्या टाळेबंदी म्हणजेच लॅाक डाऊन असल्याने सध्या अकरावीत असणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षा घेण्याबाबत येत्या १४ एप्रिलनंतर  निर्णय घेण्यात येणार असला तरी बारावीत जाणा-या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम म्हणजेच घरी बसून अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडिएफ स्वरूपात  संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन दिले आहे.  

कालच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची  झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन  बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या.साधारणत एप्रिल नंतर सुरू होणारे नवे शैक्षणिक वर्षापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि राज्यात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य नाही त्यामध्ये यावर्षी कोरोनामुळे अकरावीची परीक्षा पुढे ढकलण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या परीक्षेबाबत येत्या १४ एप्रिल नंतर निर्णय घेतला जाणार असला तरी बारावीमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडिएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सध्याच्या कालावधीत अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर रेडिओ, टिव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील पडताळणी सुरु आहे.ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी. हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र. माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

या सर्व पुस्तकांची यादी पुढील  प्रमाणे आहे -युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत अल्हाद (संस्कृत), पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी-प्राकृत (मराठी), महाराष्ट्रीय प्राकृत (मराठी), युवकभारती-हिंदी (हिंदी), युवकभारती-बंगाली (बंगाली), युवकभारती इंग्रजी  (इंग्रजी) युवकभारती- गुजराती (गुजराती), युवकभारती- उर्दु (उर्दु), युवकभारती- सिंधी (अरेबिक), युवकभारती-सिंधी (देवनागरी), युवकभारती-कन्नड (कन्नड) युवकभारती -तेलुगू (तेलुगू), शिक्षणशास्र (मराठी, इंग्रजी), पर्शियन -गुल्हा ए फारशी (उर्दु), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दु), तर्कशास्र (इंग्रजी),बालविकास  (इंग्रजी), भौतिकशास्र (इंग्रजी), रसायनशास्र (इंग्रजी), जीवशास्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग १) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग २) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग १) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग २ ) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी), वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (मराठी, इंग्रजी), चिटणीसाची कार्यपद्धती (मराठी/इंग्रजी), अर्थशास्र (मराठी/इंग्रजी), जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी/ इंग्रजी), इतिहास (मराठी), राज्यशास्र (मराठी/इंग्रजी), माहिती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी).

Previous articleमुलीचा जीव वाचविल्याचे मिळाले बक्षिस..आणि ती रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस
Next articleगृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा