मुंबई नगरी टीम
मुंबई : सतत सांगतोस,…’मला या संकटप्रसंगी राजकारण नकोय तरीही ‘उद्धवा… काही नतद्रष्टांनी,तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय,अशी भावनिक पोस्ट अभिनेते किरण माने यांनी आपल्या फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. हि पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
राज्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दिवसरात्र मेहनत घेत असतानाच यावरून राजकारण सुरू झाले आहे.यावरून खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी कालच अशा व्यक्तींना इशाराही दिला आहे.यावरून अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठिंबा देत त्यांना त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.सतत सांगतोस,…’मला या संकटप्रसंगी राजकारण नकोय तरीही ‘उद्धवा… काही नतद्रष्टांनी,तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय,खरंतर तू म्हणालास तसं, ‘राजकारण खेळायला आयुष्य पडलंय’पण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमातहे ऐकणार नाही ! तू लढत रहा वाघा.. आमचा तुझ्यावर विश्वास आहे असे अभिनेते माने यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.तू आमच्या हतबलतेचा फायदा घेऊन कृतज्ञतेच्या नांवाखाली रस्त्यावर आणून भरकटवलं नाहीस !…या अत्यंत भयावह परीस्थितीमध्ये आमच्या मनातल्या भितीला ‘हेरून’आम्हाला पोकळ एकतेचं गाजर दाखवून एकमेकांत ‘आग’ लावण्याचं राजकारण खेळला नाहीस,महाभयंकर विषाणूनं जगभर थैमान घातलेलं असताना.. प्रत्येकानं घरात शांत बसून, सोशल डिस्टन्स ठेवून,आपला जीव वाचवण्याची गरज असताना… हिंस्त्र गिधाडासारखं “रस्त्यावर या..गच्चीत या..” असं क्रूर आवाहन-आव्हान काहीच केलं नाहीस.”तुम्ही खबरदारी घ्या… मी जबाबदारी घेतो !” हे वाक्य तू ‘आतून’ – मनाच्या तळातून – उद्गारलंस…आणि आमच्या डोळ्यांत पाणी तरळलं..तू फक्त दिलासा दे.. आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत !तू तुझी जबाबदारी पार पाड.. आम्ही खबरदारीसाठी वचनबद्ध आहोत !!
उद्धवा… माझ्या राजा… बाळासाहेबांच्या बछड्या..
तू लढ…आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!!
किरण माने