प्रवीण दरेकरांनी केले आदिवासी पाड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणा-या सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा जनतेच्या मदतीला धावणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सेवाभावी वृत्तीमधून आपल्या कार्यकर्त्यांसह बोरिवली राष्ट्रीय उद्यान या परिसरातील नवापाडा तळेपाडा, डॅमपाडा, रावणपाडा, मलेपाडा,तुमणीपाडा,चुनापाडा,रंजनी पाडा, चिंचपाडा,केलडीपाडा आणि नजीकच्या परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  केले.

राज्याच कोरोनाचे संकट घोंघावताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देत प्रथम बोरिवली कांदिवली परिसरात भाजीपाला वाटप करण्याच उपक्रम सुरू केला तर हातावर पोट असणा-या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी बोरिवली कांदिवली परिसरातील सुमारे ६ हजार गरजुंना दररोज फुड पॅकेटस वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आता त्यांनी मदतीपासून वंचित असलेल्या नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांमध्ये मदतीचा हात दिला आहे.कोरोनामुळे येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे सामाजिक भान राखत या आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दरात विकल्या जात आहेत तर अनेक वस्तूंचा तुटवडा भासत आहे.अनेक नागरिकांपर्यंत या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होत नाही.कोरोनाच्या विळख्यात आलेल्या अन्य राज्यांनी नागरिकांना मदत म्हणून स्वतःच्या विशेष योजना बनविल्या आहेत.महाराष्ट्र शासनाने देखील आपले उत्तरदायित्व समजून सामान्य जनतेसाठी तांदूळ,डाळ,साखर अशा जीवनावश्यक वस्तू  राज्य सरकारच्या स्वतःच्या निधीमधून एक स्वतंत्र प्रावधान म्हणून वितरित करण्याची आवश्यकता असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी नॅशनल पार्क चे वनक्षेत्रपाल शैलेश देवरे,माजी नगरसेवक तथा हाऊंसिग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक शिल्पा चौगुले, भाजपचे मंडल अध्यक्ष दिलिप उपाध्याय यांसह वनरक्षक संदीप जाधव, अमोल कुडे, संजय शिंदे,निकिता गवळी, अर्जुन शिंदे आदी उपस्थित होते..विशेष म्हणजे या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोशल डिस्टनसिंग या नियमाचे पालन करून करण्यात आले.

Previous articleजवानांप्रमाणे कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्वाची
Next articleराज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४२०० ; १२ रुग्णांचा मृत्यू