मुंबई : पालघर येथील हत्येची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.या हल्ल्यात सामील १०१ जणांना अटक करण्यात आली असून,या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.कुणीही या घटनेचे विवाद करुन सामाजिक,जातीय तेढ निर्माण करत नाही,यावरही सरकार लक्ष ठेऊन असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.
सुशीलगिरी महाराज, जयेश आणि नरेश येलगडे हे तिघे एका व्हॅनमधून सुरतमध्ये एका व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी जात होते. या तिघांपैकी एक जण कार चालवत होता.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक गावकऱ्यांनी त्यांना चोर समजून त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली या मध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.पालघर येथे घडलेल्या घटनेप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.काल गुन्हा घडला,त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचा-यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे.या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.या प्रकरणात ११० व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये काही अल्पवयीन बालके आहेत. ३० जणांना ३० तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आले असून ९ जणांना बालगृहात पाठविण्यात आले आहे.मुंबईहून सुरतला निघालेल्या तिघांची पालघर येथे झालेल्या हत्येची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांची अटक केली गेली आहे व उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत.विनाकारण समाजात, समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व सायबर विभागाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत असेही देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान पालघर मधील या घटनेप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गृह विभागाला लक्ष केले आहे.राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे, पालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे,त्यामुळे या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यांनी केली आहे. पालघरमधील घटना ही अतिशय गंभीर आणि अमानवीय आहे. आज देश एका गंभीर परिस्थितीला सामोरा जात असताना तर हा प्रकार आणखी व्यथित करणारा आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती.