खूशखबर : …. तर राज्यातील वाईन शॉप सुरू होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्यातील मद्यप्रेमींना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीमध्ये मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करून लॉकडाऊनमध्ये सामाजिक अंतर या नियमांचे योग्य पालन केले तर दारुच्या दुकांनावर कोणतीही बंदी असणार नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र राज्यातील दारुची दुकाने केव्हा सुरु होतील हे गुलदस्त्यातच ठेवले आहे.

राज्यात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.महाराष्ट्रात दारूचा समावेश हा अत्यावश्यक सेवेच्या यादीत होत नसला तरी राज्याच्या तिजोरीत सर्वांधिक महसूल दारूच्या व्यवसायातून मिळतो,सध्याच्या टाळेबंदीमुळे दारूची दुकाने काही वेळेसाठी उघडी ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर त्याऐवजी मद्याची विक्री ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती.आता एक महिन्याच्या टाळेबंदीनंतर राज्यातील मद्यांची दुकाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीमध्ये मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करून लॉकडाऊनमध्ये सामाजिक अंतर या नियमांचे योग्य पालन केले तर दारुच्या दुकांनावर कोणतीही बंदी असणार नाही अशी माहिती त्यांनी रात्री उशीरा ट्विट करून दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमाद्वारे पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी राज्यातील दारूची दुकाने केव्हा सुरू होण्याची शक्यता आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मंत्री टोपे यांनी वरील उत्तर दिले. लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती त्यांनी त्यांनी ट्विट करून दिली आहे.मेघालय आणि आसाम राज्यांनी दारूची दुकाने आणि घाऊक गोदामांना गेल्या आठवड्यापासून मर्यादित तासांसाठी खुले ठेवण्यास परवानगी दिली आहे.मंत्री टोपे यांनी दिलेल्या संकेतानुसार मद्याचा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत  समावेश करून मद्यांची दुकाने म्हणजेच वाईन शॉप लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Previous articleराज्यात आज ४६६ कोरोना बाधीत; रुग्णांची संख्या ४६६६ वर पोहचली
Next articleराज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे भासवलं जातय : शरद पवार