जाणून घ्या ; राज्यात आजपर्यंत किती पोलीसांना झाली कोरोनाची लागण!

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सध्या ७९ पोलीस अधिकारी व २९७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून, कोरोनामुळे १८ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून  आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख १५ हजार ५९१ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख १९ हजार १६८ व्यक्तींना काँरंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्य संकटात असताना राज्यातील पोलीस रस्त्यावर उतरून जनतेचे संरक्षण करताना दिसत आहे. मात्र जनतेचे रक्षण करताना पोलीसांसह काही पोलीस अधिकारी या कोरोनाचे शिकार झाले आहेत.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील १० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ११ , पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १,ए.टी.एस.१’ ठाणे ग्रामीण १ अशा १८पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. सध्या ७९पोलीस अधिकारी व २९७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४८ घटना घडल्या. त्यात ८३० व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

२२ मार्च ते २३ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख १३ हजार ८९३ गुन्हे नोंद झाले असून २२,७९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी २८लाख १९ हजार ७४७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५ लाख १९ हजार १६८ व्यक्ती क्वारंटाईन  आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ६९,५६७ वाहने जप्त करण्यात आली.तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.राज्यात एकूण १४२०रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ८८,०३१ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Previous articleजपून पावले टाकत हळुहळु आयुष्याची गाडी पुर्वपदावर आणायची आहे
Next articleबापरे…महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना एवढे परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात गेले !