जयंत पाटलांनी केले साहित्यिकांच्या भूमिकेचे कौतुक

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील साहित्यिकांनी कोरोनासोबत लढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. साहित्यिकांची ही भूमिका अत्यंत वाखाणण्याजोगी आहे असे सांगतानाच राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साहित्यिकांचे कौतुक केले आहे.

प्रत्येक साहित्यिकाने आपल्याला मिळालेले मानधन व आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग सहायता निधीस आणि मदत करणाऱ्या स्वंयसेवी संघटनांना द्यावा असे आवाहन राज्यातील ज्येष्ठ लेखक आणि कवींनी एका निवेदनाद्वारे केले आहे.महाराष्ट्रातील साहित्यिकांनी कायमच सामाजिक, राजकीय घडामोडींच्या संदर्भात आपले सक्रिय योगदान दिले आहे. कोरोनाच्या संदर्भात अनेक साहित्यिकांनी एकत्र येत संवेदनशील अशी भूमिका घेऊन, स्वतःचे काही योगदान देण्याचाही संकल्प केला आहे त्यांच्या या संकल्पाबद्दल आणि याच आवाहनावर मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे.

Previous articleराज्यात आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्णांना डिस्चार्ज
Next articleशासकीय कामकाजाचा निपटारा होणार व्हॉट्सअप आणि मेसेजच्या माध्यमातून