सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा केविलवाणा प्रयत्न

मुंबई नगरी टीम

मुंबई : विरोधी पक्ष नेत्यांनी कुठे जाऊ नये व माहिती घेऊच नव्हे अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यामातून केला आहे. पण कोबंडे झाकले तरी सुर्य उगवायचा काही राहत नाही. विरोधी पक्ष नेत्यांना अनेक व्यासपीठे आहेत.सरकारच्या विविध व्यासपीठाच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाऊन लोकांना न्याय देण्याची भूमिका अधिक आक्रमतेने आम्ही यापुढेही दोन्ही विरोधी पक्ष नेते नक्कीच करु अश्या प्रकारचे आश्वासन आपण महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेला देत आहोत. परंतु स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी केली आहे.

घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार लोकशाहीने दिलेल्या विरोधी पक्ष नेते या जबाबदारीच्या पदाला मर्यादा आणण्याचे काम शासनाच्या या निर्णयामुळे होत आहे. गेले काही दिवस कोविडच्या वाढत्या प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गांभीर्याने पाऊले टाकणे गरजेचे होते. पण राज्य सरकारने व सरकारमधील पालकमंत्र्यांनी योग्य नियोजनाची व बैठकीची आवश्यकता असताना केवळ कोविडला घाबरुन अश्या प्रकारचे नियोजन केले नाही अशी टिका करतानाच देरकर म्हणाले की कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व आपण राज्यात दौर केले. हॉस्पिटल, कोविड सेंटर या ठिकाणी भेट दिली. संबंधित अधिका-यांशी चर्चा करुन जी निरिक्षणे आली ती निरिक्षणे व त्यावरील उपाययोजना राज्य सरकारला सादरही केली. तेथील शासकीय यंत्रणा गतिमान करण्याचा प्रयत्नही केला. पण सरकारला आपले काम जमले नाही, सरकार नियोजन करु शकले नाही तो प्रयत्न आम्ही विरोधी पक्ष नेत्यांनी केला म्हणूनच राज्य सरकारने अश्या प्रकारचा शासन निर्णय काढून विरोधकांची मुस्कटदाबी केल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

Previous articleग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती संदर्भात ग्रामविकासमंत्र्यांचे अण्णा हजारेंना पत्र
Next articleवाढदिवस साजरा करू नका ; रक्तदान,प्लाझ्मा दान शिबिरे आयोजित करा