पुण्याच्या “त्या” आजींच्या मदतीला धावले गृहमंत्री; लाखाची केली मदत

मुंबई नगरी टीम

पुणे : पुण्यातील शांताबाई पवार या ८५ वयाच्या आजींचा दांडपट्टा खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या आजींच्या मदतीसाठी लाखो हात पुढे आले असतानाच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शांताबाई पवार यांची भेट घेवून त्यांनी आजींना एक लाखांची मदत केली.यावेळी देशमुख यांनी त्यांची चौकशी करून धीर दिला.

दोन दिवसांपूर्वी  पुण्यातील शांताबाई पवार या उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या कडेला कसरती करतानाचा व्हिडिओ देश-विदेशात मोठ्या प्रमाणाक व्हारयल झाल्यानंतर त्यांची ही मेहमत पाहून त्यांना मदत करण्यासाठी अनेक होत पुढे आले.अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह सोनु सुद यांनीही या आजींना मदत करण्याची  इच्छा व्यक्त केली आहे.एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आजींच्या पुण्यातील गोसावीवस्ती येथील झोपडीपुढे मदत करण्यासाठी अनेकांनी धाव घेतली आहे.  कसरती करून आपल्या कुटुंबियांचे पोट भरण्याची वेळ आलेल्या शांताबाई पवार यांची व्यथा ऐकल्यावर गृहमंत्र्यानी आज त्यांची भेट घेतली. देशमुखांनी  या भेटीत शांताबाई पवार यांची चौकशी करीत त्यांना धीर दिला.यावेळी आजीने देशमुखांसमोर काठी फिरवून दाखवली. गृहमंत्र्यांनी यावेळी आजीला एक लाख रुपयांची मदत केली

पुण्यातील गोसावीवस्तीत राहणा-या  डोंबा-यांचा खेळ करून पोटाची खळगी भरणा-या शांताबाई पवार  यांचा दांडपट्टा खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या नातवांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. केवळ दुसरी पर्यंत शिक्षण झालेल्या शांताबाई पवार लेझीम आणि दांडपट्टा सहज खेळतात. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातूनही कला सादर केली आहे. डोंबारी खेळाने त्यांच्या कुटूंबाला आधार असून,मुलांबरोबरच मुलींना देखील शिकवले पाहिजे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleदिलासा : पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
Next articleपंकजाताईंचे आवाहन: तुम्ही,जरी पोहोचत नसला तरी तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचत आहेत