मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : राज्यावर कोरोनाचे संकट असतानाच बेरोजगार तरूणांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय १७ हजार जागा लवकरच भरणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यावर कोरोनाचे संकट असताना नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या बेरोजगार तरूणांना दिलासा देणारी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.औरंगाबाद मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले आरोग्यमंत्री टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.राज्याच्या आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय १७ हजार जागा लवकरच भरल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मेरिटवर थेट भरती करण्याला परवानगी मिळाली आहे आणि राज्यात १७ हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत असे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.