विद्यार्थ्यांना दिलासा : आता पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून,यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया येत्या १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.मात्र ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असल्याची माहीती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी,गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरील पैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती  सोबतच  ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही.  अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील.प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी  आणि ई-स्क्रूटनीची पद्धतीची माहिती,अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.असेही सामंत यांनी संगितले.

Previous articleखासगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला बसणार चाप
Next articleअनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंनी दिली “गुड न्यूज”