राज्यातील जिम  लवकरच सुरु होणार : मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत.त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील जिम चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जिम सुरु करतांना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

Previous article‘न्याय की चक्की’थोडी धीमी जरूर चलती है,पर ‘पिस्ती’बहुत बारीक है!” : अमृता फडणवीस
Next articleकोरोनामुक्तांची संख्या साडे पाच लाखाच्या उंबरठ्यावर;१ लाख ८० हजार ७१८ ॲक्टीव्ह रुग्ण