अहमदनगर दुर्घटना : जिल्हा शल्य चिकित्सकासह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई नगरी टीम

मुंबई : दोनच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात लागलेल्या आगीमुळे ११ रूग्णांना प्राण गमवावे लागले आहे.या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणे,डॉ. विशाखा शिंदे आणि एका नर्सचे निलंबन केले आहे.तर दोन नर्सना बडतर्फ केले आहे.याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.तर दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते.अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणे,डॉ. विशाखा शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर स्टाफ नर्स सपना पठारे यांचे निलंबन तर आस्मा शेख आणि चन्ना आनंत या स्टाफ नर्सची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रकरणात एकूण सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Previous articleमला क्रुझ पार्टीचे आमंत्रण होते,पण गेलो नाही,काशिफ खानला ओळखत नाही
Next articleअंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून नवाब मलिकांनी खरेदी केली कवडीमोल भावात जमीन