मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असता कामा नये म्हणून बाजूला करण्यात आलं !

मुंबई नगरी टीम

पिंपरी चिंचवड । मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यानेच मला बाजूला करण्यात आले,असा गौप्यस्फोट माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. खडसे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर प्रहार केला.वापरा आणि फेकून द्या हे भाजपाचे धोरण असल्याचा टोलाही खडसे यांनी यावेळी लगावला.भाजपासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी आपले उभे आयुष्य घातले. पण ते आज कुठे आहेत ? असा सवालही त्यांनी केला.मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील मुख्यमंत्री झाले.पण ७० वर्षाच्या राजकीय जीवनात खान्देशचा मुख्यमंत्री झाला नाही.मात्र खान्देशचा एखादा माणूस त्या पदापर्यंत पोहचत असताना त्याला मुख्यमंत्री होवून दिले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड पालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष लाच घेतो.तो कोणाच्या आदेशाने लाच घेत होता. पक्षाच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय त्याची अशी हिंम्मत होणार नाही.त्यचामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी या महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार विधानसभेत मांडावा असे आव्हान दिले.भ्रष्टाचार जाला तर हे आपल्या पदाधिका-यांची चौकशीची मागणी करत नाहीत.मात्र इतरांकडे ते बोट दाखवतात.भ्रष्ट्राचाराच्या विरोधात लढायचे असेल तर त्यांच्या चौकशीची मागणी केली पाहिजे, असेही खडसे यावेळी म्हणाले.

Previous articleशिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देणार !
Next articleमलिकांचा गौप्यस्फोट : परमवीर सिंग हेच अँटिलिया स्फोटक प्रकरणाचे मास्टरमाईंड