शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई । गोव्यामध्ये राष्ट्रवादीकडून १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले असून,पणजी मतदार संघातून भाजपने उमेदवारी नाकारलेले अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना शिवसेनेने यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे आता उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष निर्णय घेतील असेही सांगून राष्ट्रवादीने पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना भाजपने पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर उत्पल पर्रीकर यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला असतानाच आता राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.गोव्यामध्ये राष्ट्रवादीकडून १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत.गोव्यात मनोहर पर्रीकर यांनी भाजपला उभारी दिली.मात्र वारंवार भाजप नेते ज्यांच्यावर आरोप करत होते त्यांनाच दोन – दोन जागा देण्यात आल्या असल्याने भाजपने मूळ लोकांचेच तिकीट कापता येते हे स्पष्ट केले आहे.पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असून आमच्या पक्षाचा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे अध्यक्ष घेतील असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Previous articleदहावी,बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
Next articleमी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असता कामा नये म्हणून बाजूला करण्यात आलं !