मुंबई नगरी टीम
पुणे । कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता आहे.कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.तर कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या ( मंगळवारी) महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याने या दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ७ फेब्रुवारी शेवटी मुदत आहे.ही पोटनिवडणूक बिननिरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे.आज कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.तर कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या ७ फेब्रुवारी शेवटी मुदत असून या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा केल्याने या दोन्ही पैकी एका पक्षाकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल केला जावू शकतो.त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि अश्विनी जगताप यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.तर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.भाजप पक्ष हा लोकांचा कामापुरता वापर करून घेते.गरज संपली की मग भाजपा त्या लोकांना विसरतो.आजही भाजपा लोकमान्य टिळक,मुक्ता टिळक व टिळक कुटुंबाला विसरली.भाजपाला जनता कंटाळली आहे.नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपाला साफ नाकारले,भाजपाचा दारूण पराभव झाला. भाजपाने सत्तेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला,त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. जनता त्यांना मतदानाने उत्तर देणार असून कसबा व चिंचवडच्या जागेवरही महाविकास आघाडीच विजयी होईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.कोल्हापूर,देगलुर,पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवेळी भाजपाने अशी भूमिका घेतली नाही,भाजपाच्या सोईने निर्माण होणार नाही. विधानसभेची ही पोटनिवडणुक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र मिळून लढवत आहेत. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित विजयी होतील असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.