आगीत तेल ओतू नका शरद पवारांनी महसूलमंत्र्यांना खडसावले
कोल्हापूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारीत साप सोडण्याच्या कटाचे संभाषण हाती लागल्याचा दावा केला असताना,सत्ताधाऱ्यांकडून होणारी विधाने ही आगीत तेल ओतणारी असून, सरकारकडे असलेले संभाषण त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान शरद पवार यांनी दिले.
सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारी विधाने ही आगीत तेल ओतणारी असून, सरकारकडे जर ते संभाषण असेल तर त्यांनी जाहीर करावे,असे सांगत पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असेही पवार म्हणाले.ते आज कोल्हापूर मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.या वेळी पवार यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. तो निर्णय न्यायालयात टिकला नाही.त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्याचे वचन दिले होते. पण त्यांनी ते पाळले नसल्याने सध्या सुरू असलेले आंदोलन पेटले असा दावाही पवार यांनी केला.सरकारने घटनेत किरकोळ बदल करून आरक्षणाचा निराणय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.











