भूमीपूजनावरून पंतप्रधानांच्या विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी
डोंबिवली: मेट्रो ५ प्रकल्पाच्या कल्याणमधील भूमीपूजनावरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही. तसेच कार्यक्रमाचे श्रेय सेनेला मिळू नये म्हणून कार्यक्रम कल्याणला घेतला. यावर शिवसेनेने पोस्टर लावून मोदींवर टीका केली आहे. झूठ बोले कौआ काटे असा मथळा असलेले पोस्टर लावून त्यावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेला मार्ग कसा योग्य आहे, हे दाखवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ५ आणि ९ या मार्गांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. परंतु खासदार शिंदे यांनी पोस्टरवर मेट्रोच्या कामाचा गोषवारा सादर करून भाजप मेट्रोचे श्रेय घेत आहे. परंतु ये पब्लिक है सब जानती हा असा टोला त्यांनी लगावला आहे.
या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार लढाई सुरू झाली आहे. तत्पूर्वी शिवसेनेने कोस्टल रोडच्या प्रकल्पाचे भूमीपूजन केले. त्यावर भाजपने बहिष्कार टाकला होता.










