कॅाग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा कायम

मुंबई नगरी टीम

१५ जानेवारीला दिल्लीत सुटण्याची शक्यता

मुंबई : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात तीन लोकसभा जागांचा तिढा कायमच आहे.नंदूरबार,नगर आणि औरंगाबाद या जागा कोणत्याच पक्षाला सोडायच्या नाहीत. त्यामुळे हा पेच सोडवणे राज्य नेतृत्वाच्या हातात उरलेले नाहीत.१५ जानेवारीला दिल्लीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यातच फैसला होण्याची शक्यता आहे.

नंदूरबार हा परंपरागत कॉंग्रेसचा मतदारसंघ आहे. कॉंग्रेसने वर्षानुवर्षे आपल्या प्रचाराचा नारळ नंदूरबारमधूनच फोडला आहे. पण ही जागा आता राष्ट्रवादीला हवी आहे. पण नंदूरबारशी कॉंग्रेसचे भावनिक नाते आहे. ही जागा सोडणे कॉंग्रेससाठी अवघड आहे.

नगरची राष्ट्रवादीच्या कोट‌यातील जागा कॉंग्रेसला हवी आहे. येथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणूनच राष्ट्रवादी नगरवरील हक्क सोडण्यास तयार नाही.पुणे,रत्नागिरी आणि यवतमाळ या जागा कॉंग्रेसकडेच राहणार आहेत.मात्र कॉंग्रेसच्या कोट्यातील औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सतीश चव्हाण यांच्यासाठी हवी आहे. १५ जानेवारीला दिल्लीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक होणार असून त्याचवेळेस हा पेच सुटण्याची शक्यता आहे.

Previous articleकितीही यात्रा काढा,  कॉंग्रेस-राष्ट्रवादी औषधालाही उरणार नाही
Next articleपानिपतचे युद्ध पराभवासाठी ओळखले जाते