नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाहीत: मुनगंटीवार

मुंबई नगरी टीम

पंढरपूर: लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही बहुमत मिळू शकले नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पंतप्रधानपदी विचार होऊ शकतो,अशा चर्चा जोरात आहेत.पण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या.गडकरी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाहीत.त्यांच्या मनातही तसा विचार नाही,असे मुनगंटीवार म्हणाले.

तीन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला तेव्हा अचानकच गडकरी यांचे नाव पंतप्रधान म्हणून समोर आले होते.खुद्द गडकरी यांनी इन्कार केला तरीही चर्चा सुरूच होत्या.त्यातच गडकरी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना अप्रत्यक्ष टोले लगावणारी विधाने केल्यामुळे या चर्चांना हवा मिळाली होती.पण मुनगंटीवार यांनी आता पूर्णविराम दिला आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे वक्तव्य काही मंडळी मुद्दाम करत आहेत.परंतु दुष्काळग्रस्तांना मदत करण्यास राज्य सरकार सक्षम असल्याचे ते म्हणाले.केंद्र सरकारही मदत देणार आहे.पण आम्ही केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही.टॅंकर आणि चारा छावण्यांसाठी मदत सुरू केली आहे,असे सांगून,भाजप शिवसेना युतीची बोलणी सुरू होईल तेव्हा माध्यमांना कळू देणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleकपडे सोडून सगळे काही जप्त केले : भुजबळ
Next articleमाझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला : एकनाथ खडसे