२७ फेब्रुवारी रोजी सादर होणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २५ फेब्रुवारी पासून सुरु होणार असून, २७ फेब्रूवारी रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या  बैठकीत  विधिमंडळाच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली.हे अधिवेशन पाच दिवसा ऐवजी आता सहा दिवस चालणार आहे.

२५ फेब्रुवारी पासून सुरु होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे २ मार्च  पर्यंत चालणार आहे. सन २०१९-२०२० चा अंतरिम अर्थसंकल्प बुधवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहात सादर होणार आहे तर शनिवार म्हणजेच २ मार्च रोजी दुष्काळावर चर्चा करण्यासाठी या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरु राहणार आहे.या अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळामध्ये विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयके , तर विधानपरिषदेचे एक प्रलंबित विधेयक मांडण्यात येणार आहे.विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तर विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.राज्यातील भीषण दुष्काळावर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती

Previous articleअभिनेत्री शिल्पा शिंदेंचा कॅांग्रेसमध्ये प्रवेश
Next articleकॉंग्रेस राष्ट्रवादी वंचित आघाडीला ८ जागा सोडणार ?