राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला सादर होणार

मुंबई  नगरी टीम
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ फेब्रूवारीपासून सुरू होत असून, २० मार्च पर्यंत चालणा-या या अधिवेशनात ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ दिवस चालणार आहे, तर हे अधिवेशन २३ दिवसांचे घ्यावे अशी मागणी विरोधकांना केली आहे.

येत्या २४ फेब्रूवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थकल्पीय अधिवेशन सुरू होत असून,या अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात पार पडली.आज झालेल्या या बैठकीत २० मार्च पर्यंत कामकाज ठरविण्यात आले. आजच्या बैठकीत अधिवेशनाचे १८ दिवसांचे कामकाज ठरविण्यात आले.६ मार्च रोजी ११ वाजता राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे.हे अधिवेशन १८ दिवस चालणार आहे तर अधिवेशन २३ दिवस चालविण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार आहे.या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनचा कालावधी वाढविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ५ मार्चला महिला सुरक्षा कायद्यावर विशेष चर्चा करण्यात येणार आहे.या चर्चेदरम्यान संबंधित प्रकरणात आरोपींना त्वरीत शिक्षा करण्याबरोबरच आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात २६ फेब्रूवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्याचा ठराव मांडण्याचा भाजपचा विचार आहे.या ठरावामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.सावरकर यांचा गौरव झालाच पाहिजे.आम्हीही त्याच मताचे आहोत.गौरव ठराव घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतलीच असे सांगतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा.आम्ही त्यावर सभागृहात अभिनंदन प्रस्ताव आणू असे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Previous articleआता शेतकऱ्यांना मिळणार एकाच अर्जावर कृषीच्या सर्व योजनांचा लाभ
Next articleहिंगणघाट खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती