राष्ट्रवादीकडून ‘ठाकरे’ चित्रपटाचा खास शो

मुंबई नगरी टीम

नाशिक : महाराष्ट्राच्या जडणघडणीत विशेष योगदान देणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ठाकरे या चित्रपटाचे खास प्रदर्शन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी उद्या रविवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता बिग बझार येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात  करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील, स्व.वसंतराव नाईक, बॅ.ए.आर.अंतुलेंपासून तर शरद पवार साहेब व स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिले आहे.शरद पवार यांनी सतत जात,धर्म आणि पक्ष विरहित शिकवण दिली आहे.दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी जनतेच्या हिताच्या दृष्टीने संपूर्ण आयुष्य पणाला लावले. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले.  त्यांच्या या कार्याचा प्रवास त्यांच्या जीवनपटावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटातून जनतेच्या समोर मांडण्यात आला आहे.सदर चित्रपट सध्या प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या चित्रपटाचे एक विशेष प्रदर्शन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. १० फेब्रुवारी रोजी नाशिक शहरातील बिग बझार येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात  दुपारी २.३० वाजता ठेवण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी तसेच काही विशेष आमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे यांनी दिली आहे.

Previous articleएसटी महामंडळाच्या भरतीच्या अटी शिथील
Next articleमहाराष्ट्रात धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी