मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण बैठकीत यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याचे समजते.
भुजबळ यांना नाशिकमधून तर नाईक यांना ठाण्यातून लोकसभा लढवण्याची गळ घालण्यात आली होती. पराभवाची भीती असल्याने या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याचे सांगण्यात येते. २००९ मध्येही भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढवली होते होती, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. पक्षाने मात्र या दोन नेत्यांना आग्रह कायम ठेवला आहे.भुजबळ यांनी समीर भुजबळ आणि गणेश नाईक यांनी आपला मुलगा संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला. नाशिक आणि ठाण्यात भाजप आणि शिवसेना मजबूत आहेत.आणि राष्ट्रवादीची अवस्था दोन्ही ठिकाणी कमजोर आहे. जरी भुजबळ आणि नाईक यांनी विजय मिळवला असला तरी मोदी लाटेमुळे पक्षाची अवस्था बिकट झाली आहे.स्थानिक संस्था निवडणूक भाजप आणि शिवसेनेने जिंकली आहे. अर्थात आता भुजबळ आणि नाईक यांच्या नकारामुळे राष्ट्रवादीला नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत. पण लोकसभेत खासदारांची संख्या वाढवून दबाव तयार करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.