छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी नसल्याने राष्ट्रवादीमध्ये फूट ?

छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी नसल्याने राष्ट्रवादीमध्ये फूट ?

मुंबई नगरी टीम

नाशिक : छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय नेते आहेत. सध्या ते प्रचार सभांमध्ये पंतप्रधान मोदी यांची करत असलेली नक्कल गाजत आहे. परंतु ते आता लोकसभा रिंगणात नसल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते नाराज आहेत.त्यामुळे नाशिक राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांच्या नावाची मागणी होती. मात्र समीर भुजबळ यांच्या नावाची घोषणा होणार असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जाते.भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जागी समीर भुजबळ निवडणूक लढवणार आहेत. मात्र कार्यकर्त्याना छगन भुजबळ उमेदवार म्हणून हवे आहेत.

भुजबळ हे ओबीसीचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांची लोकप्रियता ओबीसीमध्ये प्रचंड आहे. तरीही त्यांनी लोकसभा रिंगणात उतरण्यास नकार दिला आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्यांसमोर पेच उभा राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ भाजपवर जहरी टीका करत आहेत. मोदी आणि फडणवीस यांची ते करत असलेली नक्कल दाद घेऊन जात आहे. त्यांना ऐकण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. आता या मुद्द्यावर पक्षाचे वरिष्ठ भुजबळ यांना निवडणूक लढवण्यास राजी करतात का,याची उत्सुकता आहे. भुजबळ मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

 

Previous articleआमच्यासोबत यायचे की नाही ते काँग्रेसने ठरवावे
Next articleअनधिकृत पार्सलची वाहतूक केल्यास बस जप्त करणार