म्हाडाच्या २१७ घरांची आणि २७६ दुकानांची उद्या जाहिरात  

म्हाडाच्या २१७ घरांची आणि २७६ दुकानांची उद्या जाहिरात  

मुंबई नगरी टीम

 मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २१७ घरांची आणि मुंबई-कोकणातील २७६ दुकानांच्या सोडतीची जाहिरात रविवारी ३ मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील २१७ घरांसाठी अर्ज नोंदणी ७ मार्च पासून सुरु होणार आहे,बँकेत अनामत रक्कमासहीत अर्ज भरण्याच्या शेवट १३ एप्रिल असणार आहे सोडत २१ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २७६ दुकानांसाठी ५ मार्च पासून सकाळी ११ वाजता ई-लिलावाचे नोंदणी सुरु होणार असून अंतिम दिनांक ३० मार्च सायंकाळी ५ पर्यंत ऑनलाईन अर्ज-अनामत रक्कम भरता येणार आहे. ई-लिलाव (ऑनलाईन बोली) सुरु होण्याचा दिनांक २ एप्रिल ते ५ एप्रिल असून दुकांनानांची सोडत ८ एप्रिल जाहीर करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चेंबूर येथील शेल टॉवर,सहकार नगर,इमारत क्र २,२३,२३,३७ एकूण १७० सदनिका ह्या ३४८ ते ३८१ चौ फुटांचा आहेत. त्याची किंमत ३१ लाख ५४ हजार ते ३४ लाख३३ हजार आहे.  मध्यम उत्पन्न गटासाठी चेम्बुर सहकार नगर येथे एक सदनिका असून त्यांची किंमत ३९ लाख ६४ हजार तर पवई येथे ४६ सदनिका असून किंमत ५५ लाख ६१ हजार आहे. सायन प्रतीक्षा नगर येथे ३५ दुकाने असूनत्यांची किंमत २२ लाख ५५ हजार ते ४० लाख २५ हजार आहे. न्यू हिंद मिल माझगांवयेथे  ४ किंमत ६१ लाख ६९ हजार आहे.  विनोबा भावे नगर कुर्ला येथे  १४ किंमत ६७ लाख १६ हजार ते ९१ लाख २५ हजार आहे. स्वदेशी मिल कुर्ला येते ५ किंमत ६७ लाख १५ हजार ते ९१ लाख २४ हजार आहे.  तुर्भे मांडलेमानखुर्द  येथे ७ किंमत ३० लाख ४८ हजार आहे तुंगा पवई येथे ५ किंमत ५४ लाख ८४ हजार आहे. मुलुंड गव्हाण पाडा येते ११ किंमत ४३लाख ५५ हजार ते ८८लाख ८३ हजार आहे. जोगेश्वरी मजासवाडी १ किंमत ७२ लाख १० हजार गोरेगांव सिद्धार्थ नगर येते १ किंमत १ कोटी ४९ लाख ४५ हजार आहे.  शास्त्री नगर गोरेगांव येते ४ किंमत ६३ लाख १८ हजर ते ७१ लाख २२ हजार आहे. तर चारकोप येथे४३किंमत  ४१ लाख ८७ हजार ते ९६ लाख ४१ हजार आहे.मालाड मालवणी ६९ किंमत ४३ लाख २४ हजार ते ५७ लाख आणि विरार-बोळींज येते ५७ किंमत १६ लाख ६८ हजार ते ९० लाख तसेच वेंगुर्ला,सिंधुदुर्ग २० किंमत १० लाख ते १६ लाख ८३ हजार आहे.

 

 

 

Previous articleबेरोजगारांना खूशखबर :  ग्रामविकास विभागात १३ हजार ५१४ जागांची मेगाभरती
Next articleआणि…पंकजाताईंच्या दिशेने शरद पवारांनी पुढे केले रायटींग पॅड